Private Advt

जळगावात बंद घर फोडले : 50 हजारांचा मुद्देमाल चोरीला

जळगाव : शहरातील जाकीर हुसेन कॉलनीतील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याच्या अंगठ्या आणि रोकड मिळून 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
चंद्रकांत लक्ष्मण आंबडकर (बारी, 25, रा.जाकीर हुसेन कॉलनी) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवार, 31 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ते कामानिमित्ताने घर बंद करून बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधली. कुलूप तोडून घरातून 30 हजार रुपयांची रोकड आणि 10 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या मिळून 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवार, 3 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता समोर आला. या संदर्भात चंद्रकांत आंबडकर यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.