जळगावात बंद घर फोडले : 44 हजाारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव : शहरातील वाघ नगर परीसरातील जिजाऊ नगरात बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून 43 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची संधी चोरट्यांच्या पथ्थ्यावर
दिनेश खिवराज लखारा (35, रा.जिजाऊ नगर, आव्हाणे शिवार, जळगाव) हे कुटुंबियासह राहतात व सोनार काम करून उदरनिर्वाह करतात. 28 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान ते दिवाळीनिमित्त एक महिन्यासाठी गावाला गेल्याने बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी ठरले. घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील 37 हजार 600 रुपयांचे दागिने व सहार हजार रुपयांची रोकड असा एकूण 43 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची बाब 29 नोव्हेंबर रोजी उघडकीला आली. या प्रकरणी दिनेश लखारा यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सतीश हाळनोर करीत आहे.

Copy