Private Advt

जळगावात पोलिस ठाण्याबाहेरच महिला-पुरूषांमध्ये झोंबाझोंबी

जळगाव : जळगाव शहर पोलिीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांसह पुरूषांमध्ये झोंबाझोंबी झाल्याने खळबळ उडाली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी भारत नगरातील सात जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सात संशयीतांविरोधात गुन्हा
शहरातील भारत नगरमध्ये राहणार्‍या काही महिला तक्रार देण्यासाठी जळगाव शहर पोलिस ठाण्यात बुधवार, 16 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजता आल्या मात्र महिलांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार न देता आपापसात भांडण करून झोंबाझोबी केली. शहर पोलिसांनी मध्यस्थी करीत भांडण सोडविले. सर्वांना शहर पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार कक्षात बसविण्यात आले. याप्रकरणी महिला कॉन्स्टेबल धनश्री दुसाणेे यांच्या फिर्यादीवरून प्राची भागवत तायडे, भारती अनिल बडगे, गणेश अनिल बडगे, रमाबाई बळीराम भालेराव, समाधान बळीराम भालेराव, रवींद्र बळीराम भालेराव, सुनीता प्रभू सोनवणे (सर्व रा. भारत नगर, जळगाव) यांच्या विरोधात भादवि कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.