Private Advt

जळगावात पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव : पाचव्या मजल्यावरून पडल्याने 29 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसात ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. औदुंबर रवींद्र पाटील (29, रा.मेहरूण, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
औदुंबर रवींद्र पाटील (29, रा. मेहरूण, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता मात्र सोमवार, 2 मे रोजी दुपारच्या सुमारास मेहरूण परीसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हा तरुण पाचव्या मजल्यावर कश्यासाठी गेला, तो चकुन पडला किंवा आणखी काही घडले? याची अधिकृत माहिती कळू शकली नाही. इमारतीकडून जाणार्‍या-येणार्‍या नागरीकांच्या हा प्रकार दिसून आल्याने घटना उघडकीला आली. याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार रतीलाल पाटील हे करीत आहे.