Private Advt

जळगावात धारदार शस्त्राने तरूणावर वार

 

जळगाव।  शिवाजी नगर परिसरात एका तरुणावर दारूच्या नशेत धारदार शस्त्राने वर केल्याची घटना घडली आहे.  एस.के. ऑईल मील येथे हि घटना घडली आहे. याप्रकरणी २५ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, इकबाल दाऊ पटेल (वय-२८) रा. कानळदा रोड, जळगाव हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २४ जानेवारी रेाजी रात्री ८ वाजता तो त्याच्या (एमएच १९ डीएम ३६६५) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जात असतांना संशयित आरोपी भोपाली उर्फ विजय वसंत अहिरे रा. कानळदा रोड, जळगाव याने दारूच्या नशेत येवून शहरातील शिवाजी नगरातील एस.के. आईल मील जवळ इकबाल पटेल याची दुचाकी आडविली व काहीही कारण नसतांना बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी इकबाल पटेल यांनी शहर पोलीस ठाण्यात रात्री १२ वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भोपाली उर्फ विजय वसंत अहिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद पाटील करीत आहे.

——————

 

——————-