Private Advt

जळगावात धाडसी घरफोडी : पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीतील बंद घरातून चोरट्यांनी अडीच लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने मिळून पाच लाखांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांच्या पथ्थ्यावर
जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील साधना आश्रमाजवळील कंवर नगरातील रोहित इंद्रकुमार मंधवानी (30) हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. रोहित याच्या आत्याच्या मुलाचे लग्न असल्याने ते कुटुंबियांसह शुक्रवार, 22 रोजी रात्री 10 वाजता अमरावती येथे घर बंद करून गेले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते सोमवार, 25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घरी परतले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्यांनी घरात जावून पाहणी केली असता हॉल, बेडरुम, किचन व स्टोरमधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आल. तर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले दिसून आले. कपाटातील सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व अडीच लाखांच्या रोकडसह व्हीएचए कंपनीच्या 40 मिक्सरच्या मोटारीदेखील चोरट्यांनी लांबवल्याचे उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती कळवण्यात आली. या प्रकरणी सोमवार, 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.