जळगावात दोन सॉ मिल आगीच्या भक्ष्यस्थानी

0

शिवाजी नगरातील घटना ; शॉर्ट सर्किटने आग लागल्याची भीती

जळगाव- शहरातील शिवाजीनगर भागातील शिवविजय सॉ-मिल व स्वस्तिक प्लायवूडला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे लाकूड आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना शनिवारी रात्री 12.30 वाजता घडली. या आगीचे निश्‍चित कारण कळू शकले नसलेतरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, शिवाजीनगर उड्डाणपुलावर क्रॉसबार असल्याने अग्निशमन बंब घटनास्थळावर पोहोचण्यासाठी अडथळा आल्याने तब्बल चार किलोमीटरचा फेरा घालत बंब घटनास्थळी पोहोचल्याने आग विझवण्यास अनेक अडचणी आल्या. शिवाजीनगरच्या लाकूडपेठेत जवाहर पटेल व प्रभुदास पटेल यांची शिवविजय सॉ-मिल असून शनिवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो 12.30 वाजेच्या सुमारास आल्यानंतर सॉ मिलमधून आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसल्या. शेजारीच वस्ती व अन्य वखारी असल्याने तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. जळगाव महापालिकेसह जैन इरिगेशन कंपनीच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले. पहाटे उशिरापर्यंत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

Copy