Private Advt

जळगावात दुचाकी चोरटे सुसाट : पुन्हा दुचाकीची चोरी

जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असून सातत्याने होणार्‍या चोर्‍यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. नेरीनाका स्मशानभूमी समोरून एकाची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. ही घटना सोमवार, 10 जानेवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली. याबाबत मंगळवार, 11 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांचा शोध घेण्याची अपेक्षा
भगुराम प्रभूदयाल कुमावत (58, रा.वर्षा कॉलनी, मोहाडी रोड, जळगाव) यांनी त्यांच्याकडील दुचाकी (एम.एच.19 बी.वाय. 4299) सोमवार, 10 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरातील नेरीनाका स्मशानभूमीजवळील मोकळ्या जागेवर पार्क केली होती व सायंकाळी पाच वाजता काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाले असता दुचाकी दिसून आली नाही. भगुराम कुमावत यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर मंगळवारी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहे.