जळगावात दुचाकी चोरटे सक्रिय : बी.जे.मार्केट भागातून दुचाकी लांबवली

जळगाव : शहरातील नवीन बी.जे.मार्केट परीसरातून तरुणाची 15 हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात चोरट्यांची टोळी कार्यरत
ज्ञानेश्वर मंगा कुंभार (35, रा.गोरगावले, ता.चोपडा, जि.जळगाव) हा तरूण खाजगी कामाच्या निमित्ताने शहरातील जुने बी.जे. मार्केट परीसरातील कृष्णा भरीत सेंटर येथे शनिवार, 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच.19 एक्यू.0439) ने आला. त्यावेळी भरीत सेंटरसमोर दुचाकी पार्कींग करून कामासाठी निघून गेला. अज्ञात चोरट्याने 15 हजार रुपये किंमतीची पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आली. ज्ञानेश्वर कुंभार यांनी दुचाकीचा परीसरात शोध घेतला परंतु ती आढळून आली नाही. या प्रकरणी ज्ञानेश्वर कुंभार यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहेत.