Private Advt

जळगावात जुगाराचा डाव उधळला : 11 जुगारी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : शहरातील मेहरूण परीसरात सुरू असलेल्या सट्टा व जुगाराच्या अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री 9.20 वाजता धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह सहा हजार 300 रुपयांची रोकड हस्तगत करीत 11 जुगारींना अटक केली. या कारवाईमुळे जुगार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील मेहरुण परीसरातील अशोक किराणा चौकात काही जण सट्टा व जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळताच त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, चेतन सोनवणे, चंद्रकांत पाटील, छगन तायडे यांनी मंगळवार, 19 एप्रिल रोजी रात्री 9.20 वाजता अशोक किराणा चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जुगारींसह जुगार खेळण्याचे साहित्य, सहा हजार 300 रुपयांची रोकड जप्त केली.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
सिराज सैय्यद रफियोद्दीन सैय्यद (49, रा.शेरा चौक, मास्टर कॉलनी, जळगाव), शेख जावेद शेख सलीम (28, अशोक किराणा चौक, रामेश्वर कॉलनी, जळगाव), अरुण सुपडू भदाणे (50, तलाठी कार्यालयाजवळ, मेहरूण), विजय रामभाऊ सोनवणे (60, रामनगर, जळगाव) पंकज अरुण महाजन (23, अयोध्या नगर, जळगाव), सुपडू चावदस सपकाळे (42, सुनसगाव, ता.भुसावळ), अजय ज्ञानेश्वर कोळी (35, महादेव मंदिराजवळ, मोहाडी), मजीत शेख बाबू शेख (46, अशोक किराणाजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव), कडू राजाराम परखड (59, रामेश्वर कॉलनी, जळगाव), जगदीश श्याम पाटील (36, पाणीपुरवठा ऑफिसजवळ, मेहरुण), लियाकत अली अजगर अली (53, लक्ष्मी नगर, जळगाव) या 11 जणांना अटक करण्यात आली व एमआयडीसी पोलिस ठाण्यात छगन तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.