Private Advt

जळगावात चोरट्यांनी दुचाकी लांबवली

जळगाव : शहरात दुचाकी चोरींचे सत्र थांबायला तयार नाही. सातत्याने होणार्‍या दुचाकी चोरीनंतरही चोरटे पोलिसांना सापडत नसल्याने वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे. शहरातील बजरंग रेल्वे बोगदाजवळील होटल केवल समोरून तरुणाची 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पेठ पोलिसात गुन्हा
प्रियेश पद्माकर भंगाळे (30, रा.सुहास नगर, भुसावळ) हा जळगाव शहरातील बजरंग रेल्वे पुलाच्या बोगद्यासमोरील केवल हॉस्पिटल येथे कामानिमित्त 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आल्यानंतर त्याने दुचाकी (एम.एच.19 बी.बी. 5654) हॉस्पिटलसमोर पार्क केली मात्र दुपारी तीननंतर तरुण परत आला असता तोपर्यंत चोरट्याने दुचाकी लांबवल्याची बाब समोर आली. बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तरुणाने अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल फिरोज तडवी करीत आहे.