Private Advt

जळगावात घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यांसह 67 हजारांचा ऐवज चोरीला

जळगाव : बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी रोकडसह 67 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना शहरातील द्रोपती नगरात घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल
भगवान सोमा पाटील (34 रा.द्रोपती नगर, प्लॉट नं 108, रायसोनी शाळेच्या मागे जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवार, 20 एप्रिल 2022 रोजी अज्ञात चोरट्याने भगवान पाटील यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडुन आत प्रवेश करीत 64 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे 10 ग्रॅम वजनाचे टोंगल, सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे काप, तीन हजारांची रोकड मिळून एकूण 67 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सलीम तडवी करीत आहेत.