Private Advt

जळगावात कुंटणखाना मालकिणीसह तिघे जाळ्यात

जळगाव : शहरातील एका कॉलनीत कुंटणखाना सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकून कुंटणखाना मालकीनीसह दलाल महिलेसह पीडीत महिलेला अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बनावट ग्राहक पाठवून कारवाई
शहरातील एका कॉलनीत कुंटणखाना सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक तयार करीत पथक कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने त्या कॉलनीत गेल्यावर त्या ठिकाणी एक महिला आपल्या घरात कुंटणखाना चालवित होती. या पथकाने बनावट ग्राहक पाठवून त्या ठिकाणी धाड टाकत कुंटणखाना मालकीन महिलेसह दलाल महिला व पीडीत महिला अशा तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, हवालदार मालती वाडीले, अर्चना पाटील, राजश्री बाविस्कर, सुनील पाटील, किरण धमके, रवींद्र मोतीराया, महेश महाले, मीनल साखळीकर यांच्या पथकाने केली.