Private Advt

जळगावात कार-ट्रकमध्ये अपघातानंतर ट्रक चालकाला मारहाण, काचाही फोडल्या

जळगाव : भरधाव कारने ट्रकला जळगाव शहरातील इच्छादेवी चौक ते कालिका माता दरम्यान धडक दिल्यानंतर ट्रकचे नुकसान झाले मात्र यानंतर कार चालक त्यावरच न थांबता त्याने ट्रक चालकास कॅबीन बाहेर काढून मारहाण केली तसेच ट्रकच्या काचादेखील फोडल्या. या प्रकरणी कार चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघात प्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव शहरातील इच्छादेवी चौक ते कालिंका माता चौकादरम्यान कारने मालट्रकला धडक दिल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. चाळीसगाव तालुक्यातील हिंगणे खुर्द येथील ट्रक चालक प्रवीणलाल चंदू बाविस्कर हे त्यांच्या ताब्यातील राखेचा बंकर ट्रक (एम.एच.30 बी.डी. 3505) घेवून भुसावळकडून जळगावमार्गे मनमाडकडे निघाले असताना बुधवार, 27 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जळगावात इच्छादेवी चौक ते कालिंका माता चौकादरम्यान ब्रेझा चारचाकी (एम.एच.15 एफ.एन.0098) ट्रकला धडक दिल्याने ट्रकच्या बोनटचे नुकसान झाले मात्र या नंतर कार चालकाने ट्रक चालकाला ट्रक बाहेर ओढून काठीने व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी ट्रकचालक प्रवीणलाल बाविस्कर यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुरुवारी कार चालकाविरोधात गुरुवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण करीत आहेत.