जळगावात उद्या निलंबित निरीक्षक बकालेंच्या अटकेसाठी मोर्चा

March In Jalgaon Tomorrow For The Arrest of Suspended Police Inspector Kiran Kumar Bakale पाचोरा : जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार, 30 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली. ते पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

25 हजार नागरीकांचा सहभाग
अशोक शिंदे हे पुढे बोलतांना म्हणाले की, मोर्चाला अन्य समाज संघटनांचाही पाठिंबा मिळाला आहे. मोर्चात 25 हजार नागरीक सहभागी होणार असल्याची माहिती देत सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन देखील शिंदे यांनी केले आहे. यावेळी व्ही.पी.पाटील (जामनेर), रोशन मराठे, जे.बी.पाटील (पारोळा), छत्रपती शिवाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष किरण बोरसे, प्रविण जाधव, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ पाटील, जयदेव पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अनिल मराठे, हिरालाल पाटील, मुन्ना पाटील, पी.एस.पाटील, दीपक मुळे, दीपक पाटील, रामा जठार, अंकुश ठाकरे, आबा देवरे, नितीन पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.