जळगाव जिल्हा रेड झोनमध्ये; जिल्ह्यात आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव: येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी चार रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या चारही रुग्णांचे अहवाल *पॉझिटीव्ह* आले आहे.

या कोरोना बाधित रूग्णांपैकी तीन रूग्ण हे अमळनेर येथील असून एक रूग्ण हा भुसावळ येथील आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या *अठरा* झाली असून यापैकी एक रूग्ण कोरोना मुक्त झाला आहे. चार रूग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रूग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे.

अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Copy