Private Advt

जळगावात आढळलेल्या मृत तरुणाची अखेर ओळख पटली

जळगाव : 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर त्याची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते मात्र या तरुणाची ओळख पटली असून तो जळगावचाच रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्ञानेश्वर नरहर दुसाने (30, कांचन नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे. शहरातील लेंडी नाल्याजवळ या तरुणाचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अखेर पटली ओळख
शनिपेठ पोलिसांच्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर दुसाणे हा तरुण हा आपल्या वडीलांसह वास्तव्यास होता व हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याला दारूचे व्यसन लागले होते. सोमवार, 2 मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातील लेंडी नाला परीसरात त्याचा मृतदेह आढळला होता. सुरूवातीला अनोळखी म्हणून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची ओळख पटली. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगळवार, 3 मे रोजी सकाळी 10 जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्याच्या पश्चात वडील आणि दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे. प्राथमिक तपास अभिजीत सैंदाणे करीत आहे.