Private Advt

जळगावात आढळलेल्या मयत अनोळखीची ओळख पटली : मयत निगडीतीत व्यावसायीक

जळगाव : शहरातील शिवकॉलनी रेल्वे पूलाजवळ रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना 4 नोव्हेंबर रोजी घडली होती. सहा दिवसानंतर या अनोळखी व्यक्तीची बुधवार, 10 नोव्हेंबर रोजी ओळख पटली आहे. घनशाम प्रभाकर जोशी (46, रा. निगडी, पुणे) असे मयताचे नाव आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा येथे सासर्‍याच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी आलेले असताना ही घटना घडल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

रेल्वेच्या धडकेत झाला होता मृत्यू
शिवकॉलनी रेल्वेपूलाजवळ रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान रामानंदनगर पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. ओळख न पटल्याने सोमवार, 8 नोव्हेंबर रोजी मयत व्यक्तीचा दफनविधी करण्यात आला होता. माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तांनुसार पिंप्राळ्यातील काही नागरिकांनी बुधवारी रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठले. मयताचे कपडे, चप्पल तसेच वर्णन दाखविल्यानुसार त्यांनी मयताची ओळख पटविली. मयत घनशाम प्रभाकर जोशी असल्याचे निष्पन्न झाले. मयत जोशी यांचे 16 ऑक्टोबर रेाजी जळगाव शहराती पिंप्राळा येथील रहिवासी सासरे हरिअर पाटील यांचे निधन झाले होते. त्याासठी मयत जोशी हे कुटुंबासमवेत 17 ऑक्टोंबर रोजी पिंप्राळ्यात आले होते. याच परिसरात शिवकॉलनी रेल्वे पूलाजवळ फिरत असतांना रेल्वे रुळावर रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. मयत जोशी निगडी येेथे कॅटरिंगचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी स्मिता, अविवाहित मुलगा ओंकार व अविवाहित मुलगी तेजस्विनी असा परीवार आहे.