Private Advt

जळगावात अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

जळगाव : वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर पोलिसांनी जप्त करीत ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

संशय आल्यानंतर ट्रॅक्टर जप्त
जळगावातील शिवकॉलनीतील राष्ट्रीय महामार्गावरून सोमवार, 9 मे रोजी पहाटे 5 वाजता विना क्रमांकाचे ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी राहुल चौधरी यांना दिसताच त्यांनी ट्रॅक्टर पकडले. वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता उडवा-उडवीचे उत्तरे मिळाल्याने वाळूने भरलेले ट्रॅक्टर रामांनदनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी पोलिस नाईक राहुल चौधरी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक उमेश विठ्ठल बाविस्कर (22, निमखेडी, ता.जि.जळगाव) याच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जितेंद्र तावडे करीत आहे.