Private Advt

धक्कादायक ! जळगावात शिवशाही बसवर दगडफेक

जळगाव – जळगाव शहराच्या जवळच असलेल्या गाडेगाव घाट येथे शिवशाही बस वर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून नुकसान केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

जळगाव हुन औरंगाबादला जाणारी बस क्रमांक एम एच 18 बी जी 871 या बसवर शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यामुळे या बसची कार्स फुटली.