Private Advt

जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव : शरातील एका भागात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले
जळगाव शहरातील एका भागात राहणारे 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून गुरुवार, 21 एप्रिल रोजी दुपारी 2 ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान संशयीत आरोपी सचिन माळी याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी सचिन माळी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.