Private Advt

जळगावातील 35 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव : शहरातील म्हाडा कॉलनी परीसरात राहणार्‍या 35 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, 28 डिसेंबर रोजी दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. निलेश गुलाबसिंग ठाकूर (35, रा.म्हाडा कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोलमजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणार्‍या निलेश ठाकूर याने मंगळवारी कुटूंबीय बाहेर गेले असता घराचा दरवाजा आतून बंद करीत दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याने दोरीने गळफास घेतलाल. ही घटना शेजारचांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी निलेशला न जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार विजय पाटील करीत आहेत.