Private Advt

जळगावातील सिंधी कॉलनीत घराला आग

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनी सेवा मंडल परीसरातील एका घराला रविवारी पहाटे आग लागली. या भीषण आगीत घरातील सर्व संसारपयोगी साहित्य खाक झाले.

पहाटेच्या सुमारास लागली आग
सिंधी कॉलनी कॉलनीतील सेवा मंडळाच्या समोर दिलीप कन्हैयालाल पमनानी यांच्या मालकीचे घर आहे. त्यांनी एका महिलेला हे घर भाड्याने दिले असून ही महिला काही दिवसांपासून हरीद्वार येथे देवदर्शनासाठी गेली आहे. घर बंद असतानाच रविवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच भीषण रुप धारण केले. परीसरातील नागरिकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार काही वेळातच चालक विक्रांत घोडेस्वार, वसंत दांडेकर, नंदकिशोर खडके, फायरमन भरत बारी, सोपान कोल्हे, नीलेश सुर्वे, भगवान जाधव या कर्मचार्‍यांनी अग्निशमन बंब घेवून घटनास्थळ गाठले. दोन अग्निशमन बंबांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत संपूर्ण घर खाक झाले आहे. घरात बोरींंग मशिनचा स्विच सुरूच असल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.