Private Advt

जळगावातील बेपत्ता इसमाचा शेतात मृतदेह आढळला

जळगाव : घरी काहीही न सांगता निघून गेलेल्या बेपत्ता इसमाचा मृतदेह गुरुवारी शेतात आढळला आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शेतात आढळला मृतदेह
गुरुवारी दुपारी आसोदा येथील रेल्वे गेट जवळच्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता संबंधीत मृतदेह हा शहरातील हरीओम नगरातील असलेल्या वाणी मंगल कार्यालयाच्या जवळील किशोर विनायक पाटील (39) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पाटील हे बुधवारी दुपारपासून कुणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने त्यांची पत्नी दीपमाला किशोर पाटील यांनी शनिपेठ पोलिस स्थानकात हरवल्याची नोंद केली होती.