Private Advt

जळगावातील फोर्ड शोरूमजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव : नशिराबादकडून जळगावकडे येत असताना सरस्वती फोर्डशोरूमसमोर कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध जखमी झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात अज्ञात कारचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नशिराबादमधील वयोवृद्ध जखमी
जळगाव तालुक्यातील नशिराबाद शहरातील बारदरी मोहल्ला येथे सुलतान शेख उस्मान (60) राहतात. शेख सुलतान हे रविवार, 17 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच.19 बी.डी.4871) ने जळगावकडे जात असताना महामार्गावरील सरस्वती फोर्ड शोरूम समोर भरधाव कार (एम.एच.05 सी.ए.1652) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील सुलतान शेख हे खाली पडले त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली तसेच दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी सुलतान शेख यांचा नातू शेख जावेद शेख आसीफ याने दिलेल्या तक्रारीवरून रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात कारचालकाविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.