Private Advt

जळगावातील दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

जळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अभिजीत विनायक कोचूरे (22, महावीर नगर, दुध फेडरेशन, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

सुप्रीम कंपनीजवळ अपघात
अभिजीत हा तरुण आई, वडिलांसह वास्तव्यास होता. 3 मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तो दुचाकीने पहूर येथून जळगावकडे येत असतांना गाडेगाव येथील सुप्रीम पाईप कंपनीजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वाहनधारकांनी तातडीने खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास अनिल फेगडे करीत आहे.