जळगावातील तिघा पोलिसांचे निलंबन

0

जळगाव : मालेगावात कोरोना बंदोबस्तासाठी नेमणूक असतानाही कर्तव्यावर गैरहजर असल्याने जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी जिल्ह्यातील तिघा पोलिसांचे निलंबन केले आहे. या कारवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित पोलिसांमध्ये जळगाव मुख्यालयातील प्रसाद सुरेश जोशी व परवेझ रईस शेख यांच्यासह मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल सुरेश रूपा पवार यांचा समावेश आहे.

चौकशीत कर्मचारी आढळले दोषी
कोरोना बंदोबस्तासाठी जिल्ह्यातून 110 पोलिस कर्मचार्‍यांना रवाना करण्यात आले होते तर नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या पाहणीत बंदोबस्ताला तैनात असलेल्यांपैकी जळगाव जिल्ह्यातील सहा कर्मचारी गैरहजर आढळले होते. नाशिक अधीक्षकांनी या संदर्भात जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे अहवाल पाठवला होता व या अहवालाची चौकशी अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या चौकशीत तीन पोलिस कर्मचारी दोषी आढळल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जळगाव मुख्यालयातील दोघांसह मुक्ताईनगरातील एका पोलिसाचे निलंबन केले.

Copy