Private Advt

जळगावातील गोलाणी मार्केटमधून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केट परीसरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
सुकलाल तुकाराम बारी (47, वाणी गल्ली, शिरसोली, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. जळगावातील गोलाणी मार्केट येथे फुल विक्री करण्याचे काम करतात. शनिवार, 9 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता ते दुचाकी (एम.एच.19 बी.बी.9266) ने गोलाणी मार्केटला आले व दुचाकी पार्क करून कामाला निघून गेले. दरम्यान, सायंकाळी सहा वाजता घरी जाण्यासाठी दुचाकी जवळ आले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. तीन दिवस दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी आढळून न आल्याने मंगळवार, 12 एप्रिल रोजी दुपारी शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक योगेश पाटील हे करीत आहे.