जळगावातील गेंदालाल मिल परीसरात घरफोडी

In Jalgaon, after breaking into a locked house, a compensation of 22,000 was demanded जळगाव : शहरातील सुरेशदादा जैन नगर भागातील गेंदालाल मिल परीसरात बंद घर फोडून रोख रक्कम, साड्या आणि घरातील वस्तू मिळून 22 हजार 800 रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी
मंगल अभिमन भालेराव (57, सुरेशदादा जैन नगर, गेंदालाल मिल, जळगाव) हे मजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. 4 ते 5 ऑगस्ट त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून 20 हजार रुपयांची रोकड, सिलिंग फॅन आणि घरातील भांडे असा एकूण 22 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. मंगल भालेराव यांनी शनिवार, 13 ऑगस्ट रोजी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार भास्कर ठाकरे करीत आहेत.