Private Advt

जळगावातील उद्यानासमोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव : शहरातील भाऊंच्या उद्यानासमोरून एकाची 12 हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा
यश दिवानचंद वलभाणी (सिटी कॉलनी, चेतनदास मेहता हॉस्पीटलसमोर, जळगाव) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार, 3 एप्रिल रोजी रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान ते शहरातील भाऊंच्या उद्यानासमोर दुचाकी (एमएच 19 बीपी 6660) ने आले होते. त्यावेळी उद्यानासमोर दुचाकी पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. बुधवार, 6 एप्रिल रोजी सकाळी रामानंद नगर पोलिस ठाण्यात त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलिस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.