Private Advt

जळगावातील उच्च शिक्षीत तरुणीला दोन लाखांचा गंडा

जळगाव : ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जळगावातील तरुणीला अशाच पद्धत्तीने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे एक लाख 97 हजार 897 रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत तरुणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विश्वास संपादन करीत केली फसवणूक
पंचमुखी हनुमान मंदिराच्या परीसरात 26 वर्षीय तरुणी ही आपल्या आई, वडील व भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहेत. त्या पुण्यातील एका नामवंत कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीला आहे. त्यांच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असून त्यांनी हे कार्ड मागील दोन महिन्यापासून घेतले आहेत. 7 मार्च रोजी तरुणी घरी असताना त्यांना दुपारी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरील महिलेने हिंदी भाषेत ‘आपको क्रेडिट कार्ड की सवलत चाहिये क्या, चाहिये होगी तो मै आपको 50 हजार रुपये भेज दुंगी’, असे सांगितले. त्यावर तरुणीने सांगितले की, मैने ऐसी कोई भी सर्विसेस नही ली है असे सांगितले. त्यानंतर समोरील महिलेने विश्वासात घेऊन तरुणीकडून मोबाईलवर ऑप्शन दिले. त्याप्रमाणे तरुणीने सांगितल्याप्रमाणे प्रोसेस कली त्यानंतर एक ओटीपी आला व आलेल्या ओटीपी त्यांना सांगितला.

उच्चशिक्षीत तरुणीला दोन लाखांचा गंडा
बुधवार, 23 मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तरुणी घरी असताना त्यांच्या मोबाईलवर आयसीआयसीआय बँकेचा मेसेज आला. त्यात त्यांनी एकूण 1 लाख 97 हजार 897 रुपयांचे ट्रांजेक्शन झाल्याचे बिल आले. हा मेसेज पाहून तरुणीला धक्काच बसला. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोल्लिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.