Private Advt

जळगावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परीसरातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
जळगावच्या सुप्रीम कॉलनी परीसरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरूवार, 9 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून घरातून पळवून नेले. मुलीच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली परंतु अल्पवयीन मुलगी कुठेही आढळून आली नाही. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यावरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.