Private Advt

जळगावातील अल्पवयीन मुलाचे अपहरण

जळगाव : शहरातील रहिवासी असलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना रामेश्वर कॉलनी परीसरातील हनुमान नगर भागात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
रामेश्वर कॉलनी परीसरातील हनुमान नगरात देवेंद्र मनोज कोळी (12) हा कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. रविवार, 17 एप्रिल सायंकाळी मुलगा घराबाहेर पडला. सर्वत्र शोध घेवूनही मिळून आला नाही. तीन दिवस उलटूनही मुलगा मिळून न आल्याने देवेंद्र याची आई लक्ष्मी कोळी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञाताने आमिष दाखवून अपहरण केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. बुधवारी एमआयडीसी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.