Private Advt

जळगावातील अयोध्या नगरातील दुचाकी चोरीला

जळगाव : शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अयोध्या नगरातील रायसोनी शाळेसमोरून दुचाकी लांबवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ
शुभम रामदास ईश्वर (27, रा.अयोध्या नगर, जळगाव) हे व्यापार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे दुचाकी (एम.एच.19 डी.ड.ी 9183) असून शनिवार, 2 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता त्यांनी दुचाकी त्यांच्या घरासमोरील रायसोनी शाळेसमोर पार्क केली होती. सायंकाळी पाच वाजता त्यांना दुचाकी जागेवर आढळून आली नाही. बुधवार, 6 एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करीत आहे.