जळगावसाठी पाच हजार अँटीजन किट्स दाखल

0

जळगाव : कोरोना रुग्णांचे निदान लवकर व्हावे यासाठी अँटीजन टेस्ट किट मागविण्यात आल्या असून सध्या पाच हजार कीट दाखल झाल्या आहेत. याद्वारे तपासणीदेखील सुरू झाली असून तपासणी केलेल्या 70 जणांचे अहवाल तत्काळ आले. यामध्ये 65 जण निगेटिव्ह आले असून पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी नागरिकांमध्ये क ोरोना तपासणीसाठी अँटीजन टेस्टचा वापर करण्यात येत असून या टेस्टव्दारे एक तासामध्ये रुग्ण बाधित किंवा अबाधित असल्याचे निदान होत आहे. त्यामुळे जळगावातही आता याची मदत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊ त यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात भेट दिली व जिल्हाधिकारी कार्यालयात उपाययोजनांचा आढावा घेतला. त्या वेळी फडणवीस यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात रुग्णालयांमध्ये शासकीय अधिक ार्‍यांचे व्यवस्थापन असावे, असे सूचविले. तसेच महापालिकेकडे केवळ एकच रुग्णवाहिका असल्याने रुग्णांना ने-आण क रण्यासाठी प्रश्न उद्भवतात, असाही मुद्दा मांडला होता. या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्यावतीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्ण व उपचार व्यवस्थापनासाठी दोन शासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकाजयांनी सांगितले. रुग्णवाहिकेच्या प्रश्नासंदर्भात मनपा दोन रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याचे सांगण्यात आले.

दररोज 1200 तपासण्या
जळगावात पाहिजे त्या प्रमाणात तपासण्या होत नाही व अहवाल लवकर येत नसल्याचे फडणवीस म्हणाले. पूर्वी अहवाल येण्याचे प्रमाण कमी होते, मात्र आता तपासण्याचे प्रमाण वाढले असून दररोज जवळपास 1200 तपासण्या होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यातील तपासण्यांचे प्रमाण पाहता सध्या 5 हजार 367 प्रति लक्ष असून ते गेल्या आठवड्यापर्यंत 4 हजार 361 पर्यंत होते. त्यात आता वाढ झाली असून ते आठ हजार प्रति लक्षापर्यंत नेण्याचे उद्दीष्ट असल्याचे जिल्हाधिक ारी राऊत यांनी सांगितले.

स्वॅब घेण्यावर भर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मनपाच्यावतीने सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने नागरिक घरीच असल्याने तपासणीस मदत होत असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले. या सर्व्हेक्षणात लॉकडाऊनच्या शेवटच्या चार दिवस 10 ते 13 जुलै दरम्यान स्वॅब घेण्यावर भर राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

‘नॉन कोविड’ रुग्णांसाठी नायब तहसीलदाराची नियुक्ती
कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांनाही वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याचा मुद्दा फडणवीस यांनी मांडला होता. त्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत इतर आजारांच्या रुग्णांना उपचार मिळण्याचे प्रमाण वाढवून त्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी एका नायब तहसीलदाराची नियुक्ती क

Copy