जळगावला कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळेस मान्यता

0

जळगाव: येथे कोविड 19 विषाणू तपासणी प्रयोगशाळेस महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची चाचपणी सुरू असून लवकरच जळगाव येथे कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार आहे. प्रयोगशाळेत केवळ करोनाचीच नव्हेतर भविष्यात उद्भवणाऱ्या कुठल्याही ही विषाणूच्या संसर्गाचे संशोधन व निदान केले जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे कार्यासन अधिकारी अमु डहाळे यांनी याबाबतचे एक पत्र काल 15 रोजी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांना पाठवले असून या पत्रामध्ये जळगावसह अंबाजोगाई, कोल्हापूर, बारामती, गोंदिया, नांदेड येथेही कोविड 19 तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

जळगाव येथे यासाठी आवश्यक जागा उपलब्ध असून येत्या दोन-चार दिवसात आवश्यक यंत्र स्थापित केल्यानंतर प्रयोगशाळा सुरू होईल अशी माहिती जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.

Copy