Private Advt

जळगाव विद्यापीठातून पत्रकाराची दुचाकी लांबवली

जळगाव : ग.स.सोसायटी निवडणुकीच्या मतमोजणीचे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराची दुचाकी भामट्यांनी लांबवली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ही घटना 30 रोजी घडली. या प्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरटे मुक्क्कामी
शहरातील व्यंकटेश नगरातील रहिवासी डॉ.गोपी सोरडे हे पत्रकार असून त्यांच्याकडे दुचाकी (एम.एच.19 ए.यू.2500) असून शनिवार, 30 एप्रिल रोजी ते ग.स.सोसायटी निवडणुकीच्या मतमोजणीचे वृत्तांकन करण्यासाठी ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आल्यानंतर त्यांनी आपली दुचाकी विद्यापीठातील सोशल सायन्स विभागाच्या पार्कींगमध्ये लावली मात्र चोरट्यांनी संधी साधून दुचाकी लांबवली. या प्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजय चौधरी हे करीत आहेत.