जळगावच्या शेतकर्‍याचे नकळत एटीएम बदलून खात्यातून 95 हजार लांबवले

95 thousand was withdrawn from the account by changing the ATM without the knowledge of Jalgaon farmer जळगाव : जळगावच्या शेतकर्‍याकडील एटीएम कार्डाची अदला-बदली करून भामट्याने 95 हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी बुधवार, 21 सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बोलण्यात गुंतवून एटीएम बदलले
जळगाव शहरातील गणेश कॉलनी परीसरातील श्रीहरी नगर येथे शेतकरी संजय पंडीतराव पाटील (51) राहतात. मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील शिवकॉलनी परीसरातील एटीएम येथे पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे काढत असतांना एकाने बोलण्यात गुंतवून संजय पाटील यांच्याकडील एटीएमकार्डची अदलाबदली केली तसेच या एटीएमच्या आधाराने त्याने संजय पाटील यांच्या खात्यावरुन 95 हजार 750 रुपये परस्पर काढून घेतले.

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा
हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बुधवार, 21 सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल फिरोज तडवी हे करीत आहेत.