Private Advt

जळगावच्या शिवाजी नगरातील 32 वर्षीय तरुण बेपत्ता

जळगाव : शहरताील शिवाजी नगर, दुध फेडरेशन परीसरातील 32 वर्षीय हेमंत राजेंद्र चौधरी (32) हा तरुण बेपत्ता झाल्याप्रकरणी शहर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.

शहर पोलिसात हरवल्याची नोंद
पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास असलेला हेमंत हा पेंटर व्यावसायीक असून शनिवार, 2 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता कामावर जातो, असे पत्नी गायत्री चौधरी यांना सांगून घराबाहेर पडला मात्र मोबाईल घरीच राहिला व रात्री नऊ वाजेपर्यंत हेमंत घरी न परतल्याने सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र न आढळल्याने अखेर रविवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यात तरुण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.