जळगावच्या व्यापार्‍याची सव्वाचार लाखात फसवणूक

जळगाव :  कराराचा भंग करून व्यापारला चार लाख 23 हजार 850 रुपयात गंडवण्यात आले. या प्रकरणी अहमदाबाद येथील गुजरात मधील कंपनीच्या मालकाविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अखेर पोलिसात तक्रार
हमीद युसुफ कच्ची (रा. कासमवाडी, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आरोपी मुकेश मिस्त्री (अंबिका इंजिनिरीअर्स रा. अहमदाबाद, गुजरात) याने 18 जानेवारी 2022 रोजी आठवले बाजार पुष्पलता बेंडाळे चौक येथे टोमेटीक लोड सेल बेस फाईव्ह हेड लिक्वीड फिलींग मशीन हे हमीद यांच्या कंपनीस देण्यासाठी केलेल्या कराराचा भंग केला. हमीद यांनी या मशीनसाठी अ‍ॅडव्हान्स 35 टक्के रुपये अर्थात चार लाख 23 हजार 850 रुपये अ‍ॅक्सीस बँक खात्यातून अंबिका इंजिनिअरींगच्या इंडीयन बँक या खात्यात जमा केले परंतु अद्यापही मशीन न मिळाल्यामुळे हमीद कच्ची यांनी आर्थिक नुकसान करुन फसवणूक केली आहे. याप्रकरणी हमीद कच्ची यांनी मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने मुकेश मिस्त्रीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.