Private Advt

जळगावच्या विवाहितेचा छळ : पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा

जळगाव : हुंड्यातील पैसे आणावेत म्हणून जळगावातील 22 वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह इतर पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

छळ असह्य झाल्याने विवाहिता परतली माहेरी
शहरातील हरीविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या शुभांगी दीपक सोनवणे (22) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील लिधुरच्या दीपक तानकु सोनवणे यांच्याशी झाला होता. सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती दीपक सोनवणे याने विवाहितेचा हुंड्याच्या पैशासाठी छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला शिवीगाळ करणे, टोमणे मारणे, मानसिक त्रास देणे व मारहाण करण्यास सुरूवात झाली तसेच सासू, सासरे, दीर आणि एक जण अशा चौघांनी गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता जळगावातील हरीविठ्ठल नगरातील माहेरी निघून आल्या.

पाच आरोपींविरोधात गुन्हा
याप्रकरणी विवाहितेने बुधवार, 9 मार्च रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती दीपक तानकू सोनवणे, सासु प्रमिला तानकू सोनवणे, सासरे तानकू गोविंदा सोनवणे, दीर मनोज तानकू सोनवणे आणि खटूबाई (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा.लिधूर, ता.जि.जळगाव) यांच्याविरोधात रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार जितेंद्र तावडे करीत आहे.