Private Advt

जळगावच्या चित्रा चौकातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव : शहरात दुचाकी चोरीच्या घटना थांबायला तयार नाहीत. शहरातील चित्रा चौकात खरेदीसाठी आलेल्या प्रौढ व्यक्तीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
सुरेंद्रकुमार शंकरलाल राका (52, रा.मुक्ताईनगर, पिंप्राळा) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 28 मार्च रोजी सायंकाळी 5.30 ते कामाच्या निमित्ताने दुचाकी (एम.एच.19 बी.एल.5766) ने शहरातील चित्रा चौकातील बालाजी ईलेक्ट्रिक दुकानावर आले. दुकानासमोर दुचाकी पार्क करून ते कामासाठी निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांनी लावलेली 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. सुरेंद्रकुमार राका हे जेव्हा परत आले तेव्हा त्यांना दुचाकी जागेवर आढळून आली नाही. परीसरात शोधाशोध करूनही त्यांना दुचाकी आढळून आली नाही. अखेर दहा दिवसानंतर बुधवार, 7 एप्रिल रोजी रात्री शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक योगेश बोरसे करीत आहे.