Private Advt

जळगावकरांनो सावधान थंडी वाढणार

जळगाव – जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीने जोर पकडला आहे. काल रात्री जळगाव शहरात तापमान 11 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली आले होते. यामुळे शहराची ठंडी एकदमच वाढल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र येत्या काही दिवसात ही थंडी अजून वाढणार असून 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे.

गेल्या काही दिवसापासून वाढलेल्या थंडीमुळे जळगाव शहरात पुन्हा अंगावर स्वेटर घातलेले नागरिक दिसत आहेत.  सकाळी थंडी वाढल्याने शेकोटी पटणाना देखील दिसत आहे. आता शहराची थंडी अजून वाढणार असून नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.