जळगांव जिल्ह्यातून भविष्यात राकेश शर्मा घडतील-डी.के.सिंग

0

नोबेल फाउंडेशन च्या विद्यार्थ्यांनी दिली इस्रोला भेट

जळगाव- सध्या जगभर 4 ते 10 ऑक्टोबर या काळात आंतरराष्ट्रीय अंतराळ सप्ताह साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने जळगाव येथील विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नोबेल फाउंडेशन तर्फे ” विज्ञान अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात होते. यात ग्रामीण भागातील ८० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला. या दौऱ्या अंतर्गत भारतीय अवकाश संशोधन संस्था( इस्रो) ,आयआयटी गांधीनगर, आयआयएम अहमदाबाद, सायन्स सिटी अहमदाबाद, साबरमती आश्रम आणि सरदार सरोवर येथील जलविद्युत प्रकल्प या ठिकाणांचा समावेश होता.

भारताच्या अवकाश प्रगती मध्ये भरीव योगदान देणाऱ्या इस्रो या संस्थेत विद्यार्थ्यांना भारताचे गगनयान या मानवी अंतराळ मोहिमेचे प्रमुख डी कुमार सिंग यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,” जळगाव सारख्या ग्रामीण जिल्ह्यातील विद्यार्थी या सप्ताहसाठी इस्रो ला येणे ही एक वैचारिक क्रांती आहे. भविष्यात जळगाव जिल्ह्यातून राकेश शर्मा घडतील, नोबेल फाउंडेशन तर्फे नवीन पिढ्या उभारणीचे मोठे कार्य सुरू आंबे. त्यांनी अवकाश मोहिमांबद्दल सांगितले की, मानवाला भविष्यात अंतराळ वसाहत स्थापन क्रमप्राप्त आहे, कारण सूर्य भविष्यात प्रसरण पावून पृथ्वी नष्ट होणार आहे .त्यामुळे जिथे सूर्य परिणाम करणार नाही अश्या जागेचा विश्वात शोध घेऊन मानवाला ग्रह बदलावा लागेल अन्यथा या ब्रह्मांडातून मानवजात नष्ट होईल.2022 मध्ये भारत अंतराळात मानव पाठवणार असून अशी उपलब्धी प्राप्त करणारा भारत हा जगात चौथा देश ठरेल,त्या दिशेने इस्रो कार्यरत आहे. ” असेही ते म्हणाले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना इस्रो चे शास्त्रज्ञ सतीश राव,जितेंद्र खर्डे ,हरीश पंड्या यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ” विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांना रॉकेट ,चांद्रयान ,मंगळ मोहीम,उपग्रह कार्यप्रणाली, उपग्रहांद्वारे जीपीएस कार्य याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी नोबेल फाउंडेशन चे अध्यक्ष जयदीप पाटील, संचालक विशाल पाटील,अनिल माला, योगेश पाटील,पवन पाटील, राजेंद्र पाटील उपस्थित होते.

आयआयटी गांधीनगर येथे विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह लर्निंग चे प्रमुख शास्त्रज्ञ मनीष जैन यांनी दैनंदिन जीवनात विज्ञान चा वापर या बाबत मार्गदर्शन केले. तसेच आयआयटी गांधीनगर चे विद्यार्थी हर्षित कुमार,प्रसाद आठवे, वैभव सैनी यांनी मार्गदर्शन केले. आयआयएम अहमदाबाद येथील परिसरात विद्यार्थी भारावून गेले.विक्रम साराभाई ग्रंथालय ,हॉवर्ड स्टेप्स, डिजिटल क्लासेस ,मठाई सभागृह येथे भेटी दिल्या, मानसी देव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासह सायन्स सिटी येथील अंतराळ प्रदर्शन, शास्त्रज्ञ कार्य प्रदर्शन ला भेट दिली. सरदार सरोवर प्रकल्प येथे विद्युत निर्मिती केंद्राचे कार्य कसे चालते याबद्दल माहिती घेतली. सहलीच्या यशस्वीतेसाठी अस्लम खाटीक,विक्रांत पाटील, रवी कुंभार,हेमंत पाटील यांनी परिश्रम घेतले.

Copy