Private Advt

जळके गावात स्टेट बँकेचे एटीएम एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

जळगाव : जळगाव तालुक्यातील जळके गावातील बसस्थानकाजवळ स्टेट बँके एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून ते मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब रविवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे मात्र सुदैवाने चोरट्यांच्या प्रयत्नांना यश न आल्याने त्यांना रीकाम्या हाती परतावे लागले.

अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
जळगाव तालुक्यातील जळके गावातील वावडदा रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीमएम आहे. शनिवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास या एटीएम मशिनच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी एटीएममध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चोरट्यांकडून एटीएम मशीन न फुटल्याने एटीएम मशिनमधील कॅश सुरक्षीत राहिली असून चोरटयांचा प्रयत्न फसला. एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर रविवारी सकाळी स्टेट बँकेचे व्यवस्थापक दीपक तिवारी यांनी एटीएमची पाहणी केली.