जलवाहिनी फुटली, पुरवठा विस्कळीत!

0

पिंपरी : येथील भाटनगरमध्ये विद्युत केबल टाकताना सांगवी ग्रॅव्हिटी लाईन फुटून पाण्याची गळती सुरु झाली. याच्या दुरुस्तीसाठी या लाईनचा पाणी पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे शहरातील काही भागाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. बुधवारी (दि.28) सायंकाळी, रिव्हर रोड येथे ही घटना घडली. अजूनही, दुरुस्तीचे काम सुरु आहे. यामुळे या वाहिनीवर अवलंबून असणार्‍या पिंपळे सौदागर गावठाण, सोसायट्यांचा भाग, काटे वस्ती आदी भाग तसेच नवी सांगवी व जुनी सांगवीचा भाग येथे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अशीच स्थिती कासारवाडी गेटाखालच्या भागातही अशीच स्थिती राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

Copy