जलयुक्त योजनेंतर्गत दहिवद गावाचा पाण्याचा प्रश्‍न सुटला

0

अमळनेर । आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांतून गोपिका नदीवरील जलयुक्त शिवार योजनेमधून झालेल्या नाला खोलीकरण, रुंदीकरण व गाळ काढणे इत्यादी प्रकारचे काम झालेले होते. परंतु येणार्‍या उन्हाळ्यात दहिवद परिसरात दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हाधिकारी रुबलअग्रवाल यांच्याकडे गिरणा पाटचारी पाणी सोडण्याची मागणी केली होती त्यावर जिल्हाधिकारी यांनी ताक्ताळ पाणी सोडण्याचे निर्देश दिले व गोपिका नदीवरील बंधारा पाण्याने फुल भरून वाहू लागला. दहिवद, दहिवद खु परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमदार शिरीष चौधरी यांनी सोडवल्याने दहिवद व दहिवद खु॥ ग्रामस्थांनी आभार मानले.

पाटचारीची पाहणी करताना यांची उपस्थिती
यावेळी आमदार शिरीष चौधरी, किरण गोसावी, मा.बांधकाम सभापती श्रीराम चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, पंकज पाटील, जयवंतराव पाटील, प्रवीण महाजन, गोकुळ महाजन, अतुल सोनवणे, शिवाजी पाळधी, आधार पाटील, सुकलाल पाळधी, बापू सोनवणे, मंगा माळी, नाना माळी, भिला माळी, राजेंद्र पाळधी, भगवान सुतार, गजानन पाटील, निवृत्ती पाटील, योगेश धनगर, भूषण पाटील, दत्तू पाटील, भबुत्राव पाटील, सुनील पाटील, अशोक पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.