जलयुक्तची व्याप्ती वाढण्यासाठी प्रयत्नशील

0

धुळे : जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टने केलेल्या कामानुसार जलयुक्त शिवार कामाची व्याप्ती वाढवून नद्या-नाले खोलीकरण आणि रुंदीकरणाचे तसेच साठवण बंधार्‍याचे काम करावे यासाठी प्रस्ताव शासनास सादर करणार असल्याचे माहिती आ.कुणाल पाटील यांनी भूमीपुजन कार्यक्रमात केले.

लघुसिंचन जलसंधारण विभाग धुळेच्यावतीने धुळे तालुक्यातील विसरणे येथील गाव नाल्यावर सिमेंट बंधार्‍याच्या कामाचा ३जानेवारी रोजी आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ.पाटील बोलत होते, ते पुढे म्हणाले कि, धुळे तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी जलस्त्रोत असतील अशा ठिकाणी विविध कामातून पाणी अडविण्याचे काम आम्ही करीत आहोत.ज्यामुळे त्याचा शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतांना दिसत आहेत. जवाहर ट्रस्टच्यामाध्यमातून साठवण बंधारे,नाले,नदीचे जास्तीत खोलीकरण व रुंदीकरण केले जात आहे.या कामांमुळे शेतीसह गावातील पाणी पुरवठा योजनांना फायदा होत आहे.अशा पध्दतीने जलयुक्त शिवार अभियानातील बदल करून व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे.दरम्यान याकरीता शासनास प्रस्ताव सादर करणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले.विसरणे ता.धुळे येथील गावनाल्यावर सिमेंट बंधार्‍याचे काम करण्यात येत असून याकरीता एकूण १४.२० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या बंधार्‍यात १८.५० टीसीएम पाण्याची साठवण क्षमता आहे.या कार्यक्रमाला आ.कुणाल पाटील यांच्या समवेत प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे,बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर,संचालक विजय पाटील, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राजीव पाटील, सरपंच जितेंद्र पाटील,तुकाराम पाटील,कृष्णा पाटील,महादू गवळी, भाऊसाहेब पाटील,अजबराव पाटील,जयवंत पाटील,हिलाल पाटील,राहूल पाटील, जीवन पाटील,भाईदास पाटील, यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.