जम्मू-काश्मीर: तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0

शोपियान: जम्मू आणि काश्मीर राज्यातील शोपियानमधील सुगान येथे आज भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली, यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. मात्र तीनही दहशतवाद्यांची ओळख पटू शकलेली नाही. सकाळपासून ही चकमक सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्याला भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. आजही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, मात्र तो जवानांनी हाणून पाडला.

Copy