Private Advt

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली; २० जणांचा मृत्यू, १३ जण जखमी

0

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीर मधील रामबन जिल्ह्यातील बनिहाल या ठिकाणी प्रवासी बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. पोलीसही त्या ठिकाणी पोहचले असून जम्मू सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींना ५० हजारांची नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचीही घोषणा केली आहे.

प्रवासी बस आज सकाळी १० च्या सुमारास केला मॉथच्या दिशेने जात होती. त्याच दरम्यान चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत जाऊन कोसळली. ही बस ज्या ठिकाणी कोसळली तो भाग खोल आहे. त्यामुळे बचाव कार्यात काहीशा अडचणी येत आहेत. सुरुवातीला दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र मृतांचा आकडा आता २० वर पोहचला आहे.